अंकिता खून प्रकरणी झारखंडमधील मंत्र्याच्या मुलाला अटक

अंकिताचा खून झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. श्रीनगरचे सीओ श्याम दत्त नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक अंकित यांच्यासह तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

    नवी दिल्ली : लक्ष्मणझुला पोलिसांनी मोठी कारवाई करत पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमध्ये असलेल्या गंगा भोगपूरच्या वनांतर रिसॉर्टमध्ये काम करणारी अंकिता भंडारी (१९) बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. अंकिताचा खून झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. श्रीनगरचे सीओ श्याम दत्त नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक अंकित यांच्यासह तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

    एएसपी शेखर सुयाल यांनी सांगितले की, वनांतर रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, अंकित गुप्ता आणि सौरभ यांनी अंकिता भंडारीची हत्या केली आहे. तिघांनीही तीला रिसॉर्टपासून काही अंतरावर नेऊन चिला शक्ती कालव्यात फेकून दिले, त्यानंतर तो सतत या प्रकरणाची दिशाभूल करत होता. सध्या एसडीआरएफची टीम चिला शक्ती कालव्यात शोध मोहीम राबवत आहे.

    पोलिसांनी तिघांना अटक केली असून खुनासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. कोटद्वारचे एसडीएम प्रमोद कुमार म्हणाले की, रिसॉर्टच्या कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे. हे रिसॉर्ट नियमांविरुद्ध केले असेल, तर त्यावरही कारवाई केली जाईल.