
झारखंडमधील आमदारांना जॅकपॉट (Salary to MLA) लागला असून, मासिक 2.88 लाख रुपये वेतनासह देशात सर्वाधिक वेतनमान असल्याचा मानही त्यांना मिळाला आहे. झारखंडमध्ये आमदारांच्या सुधारित वेतन वाढीला मंजुरी मिळाली आहे.
रांची : झारखंडमधील आमदारांना जॅकपॉट (Salary to MLA) लागला असून, मासिक 2.88 लाख रुपये वेतनासह देशात सर्वाधिक वेतनमान असल्याचा मानही त्यांना मिळाला आहे. झारखंडमध्ये आमदारांच्या सुधारित वेतन वाढीला मंजुरी मिळाली आहे. हा निर्णय ‘गेमचेंजिंग’ मानला जात आहे. या निर्णयानंतर आता झारखंडचे आमदार (Jharkhand MLA) इतर राज्यांच्या लोकप्रतिनिधींच्या तुलनेत सर्वाधिक मानधन घेणारे बनले आहेत.
झारखंडचे दरडोई उत्पन्न दिल्लीच्या तुलनेत कमी आहे, तरीही येथील आमदार आर्थिक लाभाच्या बाबतीत देशातील अनेक राज्यांपेक्षा पुढे आहेत. झारखंडच्या आमदारांचे सध्याचे वेतन पॅकेज इतर राज्यातील आमदारांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा खूप जास्त आहे. दिल्लीतील आमदारांना फक्त 95 हजार रुपये पगार आणि भत्ते मिळतात.
सोयीसुविधांचाही समावेश
झारखंडच्या 2.88 लाख मासिक वेतनासह अन्य आलिशान सुविधा मिळणार आहेत. 15 नोव्हेंबर 2000 रोजी स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झालेल्या झारखंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून आमदारांच्या वेतनात सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या स्थापनेपासून वेतनवाढीची ही सातवी वेळ आहे.