‘जो मोहब्बत इनसे मिली है, वही देश से बाँट रहा हूँ।’; राहुल गांधींचा आईसोबतचा फोटो शेअर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या आईबरोबरच फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या यात्रेला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरु झाली असून आता दिल्लीत दाखल झाली आहे.

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज राहुल गांधींबरोबर (Rahul Gandhi) ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) सहभागी झाल्या. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या आईबरोबरच फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या यात्रेला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून (Kanyakumari) ही यात्रा सुरु झाली असून आता दिल्लीत दाखल झाली आहे.

    आज हजारो लोकांनी राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. फरिदाबादमधून राहुल गांधींनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल चौधरी (Anil Choudhari) यांनी राहुल यांचे स्वागत केले. येथील आश्रमामध्ये सर्वांना तीन तास विश्रांती घेतली. दिल्लीमध्ये या यात्रेने प्रवेश करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, पवन खेरा, रणदीप सुरजेवाला, भुपिंदर सिंग हुड्डा, कुमारी शैलजा हे नेते त्यांच्याबरोबर होते. या यात्रेमध्ये सोनिया गांधी आणि राहुल यांची बहिण प्रियंका गांधी यांनीही सहभाग घेतला.

    राहुल गांधींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनिया गांधी मास्क घालून उभ्या असल्याचे दिसते. सोनिया गांधींच्या मागे उभ्या असलेल्या राहुल यांनी आपल्या आईच्या गळ्यात घात घालून खांद्यावर हनुवटी टेकवत हसतानाचा हा फोटो आहे. जे प्रेम आईकडून मिळते तेच देशामध्ये वाटत आहे, अशा अर्थाच्या कॅप्शनसहीत राहुल गांधींनी हा फोटो शेअर केला आहे. ‘जो मोहब्बत इनसे मिली है, वही देश से बाँट रहा हूँ।’ अशी हिंदीमध्ये कॅप्शन या फोटोला दिली आहे.