नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी आहेत रिक्त जागा

  • नाबार्डच्या विविध विभागांमध्ये पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. तसेच या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमदेवारांनी नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी.

नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर रूरल डेव्हलपमेंटने विविध विभागांमध्ये पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. तसेच या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमदेवारांनी नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन अर्जाद्वारे भरू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२० आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.

या पदांसाठी आहेत रिक्त जागा आणि पगाराची संधी – 

प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी एक जागा रिक्त आहे. तसेच या पदासाठी दरमहा वेतन ३ लाख रूपये मिळणार आहेत.

वरिष्ठ विश्लेषक या पदासाठी माहिती सुरक्षा ऑपरेशन्स ही जागा रिक्त आहे. त्याचप्रमाणे या पदासाठी दरमहा वेतन अडीच लाख रूपये दिले जाणार आहे.

ज्येष्ठ विश्लेषक या पदासाठी नेटवर्क आणि एसडीडील्ब्यूएन ऑपरेशन्स ही जागा रिक्त आहे. या पदासाठी तुम्हांला दरमहा वेतन २.५ लाख रूपये इतके दिले जाणार आहे.

प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी आयटी ऑपरेशन्स ही जागा रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी दरमहा वेतन अडीच लाख रूपये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विश्लेषकसह मुख्य डेटा सल्लागार, अतिरिक्त सायबर सिक्युरिटी मॅनेजर, अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक यांमध्ये क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, बीसीपी अशा विविध पदासांठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

दरम्यान, नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर पदांसंबंधी तपशील, रिक्त जागा आणि पगाराची माहिती दिली गेली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी.