ईडीसह केंद्रीय अन्वेषण यंत्रणांविरुद्ध न्यायालयीन चौकशी; केरळ मंत्रिमंडळाचा निर्णय

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की,"सोने आणि डॉलरच्या तस्करीसंदर्भातील प्रकरणांवरील चौकशीकडे वळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने न्यायालयीन चौकशीची शिफारस केली आहे. तथापि, निवडणूक आचारसंहिता येथे लागू झाली आहे.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, तिरुवनंतपुरम.

    सोन्याच्या तस्करी प्रकरणात केरळच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केरळ मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत अंमलबजावणी संचालनालयासह केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशीची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की,”सोने आणि डॉलरच्या तस्करीसंदर्भातील प्रकरणांवरील चौकशीकडे वळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने न्यायालयीन चौकशीची शिफारस केली आहे. तथापि, निवडणूक आचारसंहिता येथे लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर येथे आयोगाची स्थापना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.