There will be no more autopsy; Home Department Order

विमलेशचे वडील राम अवतार यांनी सांगितले की, हृदयाचे ठोके चालू होते, त्यामुळेच आम्ही ठेवत होतो. डॉक्टरांची तपासणी केली होती, तेव्हा त्यांनी तो जिवंत असल्याबद्दल म्हटले होते. राम अवतार हे ऑर्डिनेंस कारखान्यातून निवृत्त झाले आहेत. भाऊ दिनेश यांनी सांगितले की, आम्ही शरीरावर कोणतीही पेस्ट लावली नव्हती. मृत्यू झाला तेव्हा आम्ही अंत्ययात्रेची तयारी करत होतो.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. आयकर अधिकारी विमलेश सोनकर यांच्या मृतदेहासोबत कानपूरमधील एक कुटुंब दीड वर्षांपासून राहत होते. शुक्रवारी विभागाचे कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर ही बाब उघडकीस आली. कुटुंबीय त्याला कोमात असल्याचे सांगत राहिले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृत्यू नेमका केव्हा झाला हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार आहे.

    विमलेशचे वडील राम अवतार यांनी सांगितले की, हृदयाचे ठोके चालू होते, त्यामुळेच आम्ही ठेवत होतो. डॉक्टरांची तपासणी केली होती, तेव्हा त्यांनी तो जिवंत असल्याबद्दल म्हटले होते. राम अवतार हे ऑर्डिनेंस कारखान्यातून निवृत्त झाले आहेत. भाऊ दिनेश यांनी सांगितले की, आम्ही शरीरावर कोणतीही पेस्ट लावली नव्हती. मृत्यू झाला तेव्हा आम्ही अंत्ययात्रेची तयारी करत होतो. तेव्हाच हृदयाचे ठोके सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर अंत्यविधी थांबवण्यात आला. त्याच्या अंगातून कसलाही वास येत नव्हता.

    हे प्रकरण रोशननगरच्या कृष्णपुरमचे आहे. येथे विमलेश सोनकर हे पत्नी मितालीसोबत राहत होते. मिताली को-ऑपरेटिव्ह बँकेत काम करतात. विमलेश सोनकर हे अहमदाबाद इन्कम टॅक्समध्ये AO म्हणून कार्यरत होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, २२ एप्रिल २०२१ रोजी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मोती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.