kapil sibal

ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal Criticized Congress) यांनी स्वत:च्याच पक्षावर टीका केली आहे. सिब्बल यांनी म्हटले आहे की, देशाने त्यांच्या योगदानाचा सन्मान केला मात्र काँग्रेसला (Congress) त्यांची गरज नाही, हा खूप मोठा विरोधाभास आहे . 

    गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार (Padmabhushan Award To Gulam Nabi Azad) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal Criticized Congress) यांनी स्वत:च्याच पक्षावर टीका केली आहे. सिब्बल यांनी म्हटले आहे की, देशाने त्यांच्या योगदानाचा सन्मान केला मात्र काँग्रेसला (Congress) त्यांची गरज नाही, हा खूप मोठा विरोधाभास आहे .

     

    काँग्रेस नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे G-23 गटामध्ये सामील आहेत. हा गट पक्षाच्या नेतृत्वामध्ये संघटनात्मक बदल करण्याची मागणी करत होता. केंद्र सरकारकडून गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावरून कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सुनावलं आहे.

    कपिल सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की , “गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण. अभिनंदन भाईजान. काँग्रेसला त्यांची गरज नाही. मात्र देशाने त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा सन्मान केला आहे. हा फार मोठा विरोधाभास आहे.”

    कपिल सिब्बलही  G-23 गटामध्ये सामील आहेत.