‘करिश्मा फक्त माझी, लग्नाची मिरवणूक आणू नको, नाहीतर स्मशान करुन टाकीन’, एकाची वराला धमकी

वराच्या घराबाहेर लावलेल्या पोस्टरमध्ये आरोपीने म्हटले आहे की, उघड्या कानांनी ऐका, मोंटू सिंग, वरराजा, करिश्मा माझी आहे… मिरवणुक घेऊन येऊ नका… नाहीतर जगू देणार नाही. मी मिरवणूक स्मशानभूमी बनवीन.

    नवी दिल्ली – हापूरमध्ये एका तरुण प्रेमात इतका आंधळा झाला की त्याने वराला पत्र लिहून धमकी दिली. त्याने लग्नाची मिरवणूक न आणण्याचा इशारा दिला. या वेड्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने हे पत्र वराच्या घराबाहेर ठेवले. आता वराच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण सिंभोली परिसरातील फरीदपूर गावाशी संबंधित आहे, जिथे भिंतीवर धमकीचे पत्र चिकटवलेले आढळले. पत्र लिहिणारी व्यक्ती दबंग असल्याने कुटुंबाला धोका असल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे.

    हा फक्त ट्रेलर..
    वराच्या घराबाहेर लावलेल्या पोस्टरमध्ये आरोपीने म्हटले आहे की, उघड्या कानांनी ऐका, मोंटू सिंग, वरराजा, करिश्मा माझी आहे… मिरवणुक घेऊन येऊ नका… नाहीतर जगू देणार नाही. मी मिरवणूक स्मशानभूमी बनवीन. एवढेच नाही तर आरोपी तरुणाने वर्हाडींना धमकावले आहे. ज्या भावाला गोळी खायाची आहे… त्यांनी मिरवणुकीत यावे, असे त्याने म्हटले आहे. आरोपीने पुढे लिहिले आहे – सध्या हा फक्त ट्रेलर आहे, बाकीचा फ्लिम मिरवणुकीत दाखवेल.

    अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
    पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, 18 फेब्रुवारी रोजी गडमुक्तेश्वर तहसील परिसरात मॉन्टी सिंगच्या लग्नाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मात्र मिरवणुकीला जाण्यापूर्वीच एका वेड्याने वराच्या गावात पोहोचून धमकीची पत्रके चिकटवली. सध्या पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेला दुजोरा देताना हापूरचे एएसपी मुकेश मिश्रा म्हणाले की, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस पूर्णपणे वर आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत.