हरियाणात 30 वाहनांचा विचित्र अपघात, धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 ठिकाणी अपघात

एकाचवेळी अनेक वाहनांचा अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जखमी प्रवाशांचा आकांत दूरवर ऐकू येत होता. धुक्यामुळे हरियाणा रोडवेज्या 2 बसही दुर्घटनाग्रस्त झाल्या. त्यात काही प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

    नवी दिल्ली – हरियाणातील कर्नाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर धुक्यामुळे 3 ठिकाणी अपघात झालेत. तिन्ही ठिकाणी 30 वाहने एकमेकांना धडकली आहेत. त्यात 12 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पोहोचवले.

    पहिला अपघात कुटेल ओव्हर ब्रिजजवळ घडला. त्यात 15 ते 16 वाहने एकमेकांना धडकली. ट्रक, कार, ट्रॅक्टर ट्रॉली व बस दुर्घटनाग्रस्त झाल्या. त्यात काहीजण जखमी झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिस व वाहन चालकांत अफरातफरी माजली. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

    एकाचवेळी अनेक वाहनांचा अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जखमी प्रवाशांचा आकांत दूरवर ऐकू येत होता. धुक्यामुळे हरियाणा रोडवेज्या 2 बसही दुर्घटनाग्रस्त झाल्या. त्यात काही प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

    या अपघातात हरियाणा रोडवेजच्या बसखाली एक डस्टर कार शिरली. त्यात काही प्रवाशी जखमी झाले. दुर्घटनेमुळे हायवेवर एखाद्या खेळण्यासारखे वाहने पडली होती.

    दुसरीकडे, मधुबनजवळ दुसरा अपघात झाला. या ठिकाणी 10 ते 12 गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यात प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींना पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात हलवले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तिसरा अपघात कर्नाळ टोलजवळ झाला.

    पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे हा अपघात घडला. त्यात 30 वाहने एकमेकांना धडकून 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सकृतदर्शनी धुक्यामुळे घडल्याचा दावा केला जात असला तरी त्यामागील नेमके कारण शोधण्याचा तपास केला जात आहे.