karnatak news

आमदार एम श्रीनिवास यांनी एक भयानक प्रकार केला आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना (Karnataka MLA Slapped College Principal) कानशिलात लगावली आहे.

    कर्नाटकमध्ये (karnataka) जनता दल सेक्युलर (जेडीएस) (JDS)आमदार एम श्रीनिवास यांनी एक भयानक प्रकार केला आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना (Karnataka MLA Slapped College Principal) कानशिलात लगावली आहे. कॉम्प्युटर लॅबसाठी सुरु असलेल्या विकासकामाबाबत प्राचार्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या आमदार एम श्रीनिवास यांनी त्यांना कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राचार्यांसोबत असे वागल्यामुळे  लोकांनी श्रीनिवासवर टीका केली आहे.

    आमदार श्रीनिवास यांनी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नागानंद यांनी महाविद्यालयाच्या विकासकामांची योग्य माहिती आमदारांना दिली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या वागण्याने नाराज झालेल्या आमदार एम श्रीनिवास यांनी मुख्याध्यापकांना सगळ्यांसमोर चपराक मारली. आमदारांनी अनेकवेळा प्राचार्यावर हात उगारला. या  घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.  आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

    या घटनेबाबत मंड्या जिल्ह्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंभू गौडा यांनी मंगळवारी ही बाब जिल्हा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. गौडा यांनी असोसिएशनची एक बैठक बोलावली आहे. त्यांनी प्राचार्य नागानंद यांचीही भेट घेत त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.