Karni Sena Chief Sukhdev Singh Gogamedi Shot Dead
Karni Sena Chief Sukhdev Singh Gogamedi Shot Dead

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्येप्रकरणी शार्पशूटर नितीन फौजीला आश्रय दिल्याच्या आरोपावरून जयपूर एसआयटीने सतनाली पोलिस स्टेशन परिसरातील सुरेती पिलानिया गावातील दोन भावांना अटक केली.

    नारनौल : करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्येप्रकरणी शार्पशूटर नितीन फौजीला आश्रय दिल्याच्या आरोपावरून जयपूर एसआयटीने सतनाली पोलिस स्टेशन परिसरातील सुरेती पिलानिया गावातील दोन भावांना अटक केली. आरोपींपैकी मोठा भाऊ दिल्लीत एलएलबी करत असून, लहान भाऊ जयपूरमध्ये कोचिंग घ्यायचा.

    एसआयटी जयपूरचे नेतृत्व एएसपी अभिषेक करत असून, त्यांनी नितीन फौजीचा वर्गमित्र रामबीरला दिल्लीतील पीजी येथून अटक केली आहे. यानंतर पथकाने सतनाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरेती पिलानिया गावात पोहोचून रामबीरचा मोठा भाऊ करमबीरला अटक केली. एसआयटीला रामबीर जयपूरमध्ये कोचिंग घेत असल्याची माहिती आणि नितीन फौजी त्याच्याकडे थांबला होता, अशी माहिती मिळाली होती.

    रामबीरने दिल्लीत एलएलबी करत असलेल्या लहान भाऊ करमबीरला याबाबत कळवले होते. करमबीरने त्याला जयपूरवरून दिल्लीला बोलावले आणि तो स्वतः त्याच्या गावी आला. रामबीर करमबीरच्या पीजीमध्ये लपला होता. एसआयटी जयपूरने प्रथम रामबीरला दिल्लीत अटक केली आणि त्यानंतर सायंकाळी सुरेती पिलानियातून करमबीरला उचलले.