काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशिद वाद; मुस्लीम पक्षकांना कोर्टाचा झटका

काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशिदीमध्ये सुरू असलेल्या वादावर वाराणसी न्यायालयाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या जागी शृंगारगौरी मंदिर होते, असा दावा करणारी याचिका दिल्लीतील पाच महिलांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. त्यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सर्वेक्षणाच्या कामासोबतच या खटल्यात नियुक्त करण्यात आलेले कोर्ट कमिशनर यांना हटवण्यात येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे(Kashi Vishwanath Temple-Gyanvapi Masjid Debate ).

  वाराणसी : काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशिदीमध्ये सुरू असलेल्या वादावर वाराणसी न्यायालयाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या जागी शृंगारगौरी मंदिर होते, असा दावा करणारी याचिका दिल्लीतील पाच महिलांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. त्यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सर्वेक्षणाच्या कामासोबतच या खटल्यात नियुक्त करण्यात आलेले कोर्ट कमिशनर यांना हटवण्यात येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे(Kashi Vishwanath Temple-Gyanvapi Masjid Debate ).

  सर्वेक्षण पूर्ण करून 17 मे रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या सर्वेक्षणात कोर्ट कमिशनरसह अन्य दोन वकीलही काम पाहतील. तसेच, या कामात कुठलीही बाधा येऊ नये याची खबरदारी बाळगण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

  मुस्लिम पक्षकारांनी कोर्ट कमिश्नर बदलविण्याची मागणी केली होती ती न्यायालयाने फेटाळून लावली. यासोबतच न्यायालयाने दोन विशेष कमिश्नरही नियुक्त केले आहेत. विशाल सिंह आणि अजय प्रताप सिंह यांची विशेष कमिश्नर म्हणून कोर्टाने नियुक्ती केली.

  कमिशनची कारवाई सकाळी 8 ते 12 या कालावधीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच मशिदीच्या कानाकोपऱ्याचेही सर्वेक्षण करण्याचे आदेश देतानाच जो विरोध करेल त्यावर कारवाई करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. शृंगार गौरीच्या श्री काशी विश्वनाथ ज्ञानवापी संकुलात नियमित दर्शन होत असल्याप्रकरणी अधिवक्ता आयुक्त बदलण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली होती.

  ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी सर्वेक्षण प्रकरणात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय राखून ठेवला. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवीकुमार दिवाकर यांनी पुढील सुनावणीसाठी 12 मे ही तारीख निश्चित केली होती.

  काय आहे मंदिर-मशीद वाद?

  ज्ञानवापी मशीद औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली असा दावा अनेकांनी केला आहे. हा मंदिर-मशीद वाद वर्षानुवर्षे जुना असून वर्षांपूर्वी त्यावरून दंगली झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या मुद्यावरून दंगल झाली नाही. अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा तापल्यानंतर (1991) मध्ये ज्ञानवापी हटवून त्याची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला द्यावी यासाठी दाखल करण्यात आलेली पहिली याचिका दाखल करण्यात आली होती.