मास्कचा वापर करा, पंतप्रधानानांचं आवाहन, देशात लॉकडाऊन लागणार का? IMAचं काय उत्तर?

देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभुमीवर पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले की देशात अद्याप मास्क अनिवार्य केले नाहीत, परंतु नागिराकांना त्यांनी मास्क वापरण्याचा सल्ला दिला.

  नागपूर: चीनमधील कोरोनाची स्थिती पाहता इतर देशानंही आता कोरोनाची धास्ती घेतली आहे. चीनसहीत आता भारतातही कोरोनाचा नवा वेरियंट BF.7  पासून उद्भवणारा धोका लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने  गुरुवारी कोरोना संदर्भात काही महत्तावाचे निर्देश दिले आहेत. कोरोना चाचणी करणे, बूस्टर डोस वाढवणेेेेेेेे, टास्क फोर्स स्थापन करणेे यासारखे निर्देश दिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नागरिकांन मास्क वापरा अस सागितंलय तर जीनोम सिक्वेन्सिंग आणि कोरोना चाचण्या करणे याबाबतही निर्देश दिलेय.

  राज्य सरकारचे निर्देश

  आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की,  राज्यातील कोरोना स्थिती हातळण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड-योग्य वर्तन या पाच-स्तरीय धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. “आम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण राज्यातील सुमारे 95% लोकसंख्येचे लसीकरण आधीच झाले आहे. कोविडच्या नवीन धोक्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे निर्णय आज घेण्यात आले. नंतर, या सल्लागारावर मंत्रिमंडळातही चर्चा झाली होती,” अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी दिली.

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकरानेही सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन राज्यात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर, विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि पूर्वीच्या नियमांनुसार 5-10 फूट कोविड अंतर राखणे या संदर्भात नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  RT-PCR चाचणी वाढवण्याचे निर्देश

  महापालिका संस्थांना सतर्क राहण्याचे निर्देश पाठवण्यात आले आहेत, असे सांगून सावंत म्हणाले की, आरोग्य अधिकाऱ्यांना जीनोम सिक्वेन्सिंग सुरू करण्यासह सर्व खबरदारी घेण्यास सांगितले आहे. नागरी संस्थांना RT-PCR चाचणी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, “सरकार खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. जर केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे आणली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला पुढील कारवाईचे निर्देश देतील,” ते म्हणाले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिले निर्देश

  देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभुमीवर पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले की देशात अद्याप मास्क अनिवार्य केले नाहीत, परंतु नागिराकांना त्यांनी मास्क वापरण्याचा सल्ला दिला. तसेच जीनोम सिक्वेन्सिंग आणि कोरोनाच्या चाचण्या वाढवण्या याव्या असे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच कोरोना उपचारादरम्यान रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्वसुविधा करव्यात, रुग्णालयात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरचा साठा ठेवण्यात यावा, तसेच व्हेंटिलेटर, रुग्णालयातील कर्मचारी याबाबतही रुग्णालयाने काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हण्टलं.

  IMA चं काय म्हणणं?

  कोरोनाचा वाढता धोका पाहता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने लोकांना सावधगिरी घेण्यासह कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आणि सामाजिक-अंतराचे नियम पाळणे यासारख्या कोविड नियमांच पालण करण्याचं आवाहन केलं आहे.