सुक्षिशित केरळमध्ये हुंडाबळी, बीएमडब्ल्यूसाठी अडून बसला नवरदेव; लग्न मोडलं, डॅाक्टर मुलीची आत्महत्या!

केरळमध्ये एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे. भाड्याच्या खोलीतून त्याचा मृतदेह सापडला. या आत्महत्येचे कारण लग्न मोडल्याचे सांगितले जात असून, सध्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

    सुक्षिशित केरळचं (Kerala) उदाहरण सगळीकडे दिलं जातं. शिक्षणाला महत्त्व देणारं राज्य अशी ओळख असलेल्या या राज्यातही हुंड्याच्या प्रथेमुळे एक सुक्षिशित तरुणी हुंडाबळी ठरली आहे. लग्नात हुडं न दिल्याने नवरदेव अडून बसला आणि त्याने लग्न मोडलं. यामुळे दुखावलेल्या २६ वर्षीय डॉ. शहानाने आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमक काय आहे प्रकरण जाणुन घेऊया.

    नेमकं प्रकरण काय

    केरळमधील तिरुवनंतपुरम येथील हे प्रकरण  आहे. शहाना तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. आता 5 डिसेंबर रोजी ती भाड्याने राहत असलेल्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान कळलं की, की लग्न तिच्या प्रियकरासोबत ठरलं होतं. लग्नाची पुर्ण तयारी झाली होती मात्र, ऐनवेळी मुलाच्या घरच्यांनी सोने, जमीन आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती.  शहानाच्या कुटुंबिायांनी त्यांची ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने मुलाने संबंध तोडले. हा धक्का मुलीला सहन न झाल्याने मुलीने आत्महत्या करत तिचं आयुष्य संपवल.  ज्या मुलावर हा आरोप करण्यात आला आहे तो मेडिकल पीजी डॉक्टर्स असोसिएशनचा प्रतिनिधी आहे. डॉ रुवैस असे त्याचे नाव आहे. या

    मुलाला अटक

    सध्या  या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. यासोबतच आरोपी डॉ.रुवैजलाही अटक करण्यात आली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी महिला आणि बालविकास विभाग चौकशी करून अहवाल तयार करणार असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहानाचे वडील मध्यपूर्वेत काम करत होते, त्यांचे नुकतेच निधन झाले. आता घरातली मुलीने आयुष्य संपवल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.