क्रिकेट विश्वचषक सामन्यांपूर्वी हिमाचलमध्ये सक्रिय झाले खलिस्तानी, भिंतीवर लिहीलं ‘खलिस्तान जिंदाबाद’!

परिसरातील लोकांना भिंतीवर खालिस्तान जिंदाबाद लिहिलेलं आढळ्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिस स्टेशनचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आता पोलिस तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहे.

    खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून (khalistani terrorist Nijjar Murder ) भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव आहे. यावरुन कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन  टुडो यांनी भारतावर केलेल्या विधानावरुन सध्या वातावरण तापलं आहे. असं असूनही या परिस्थितीचा फायद खालिस्तानी समर्थक करताना सध्या दिसत आहे. या तणावाच्या काळात खलिस्तानवाद्यांकडून देशातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सध्या दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशालाच्या भिंतींवर खलिस्तान झिंदाबादचे नारे (Khalistani Slogen In Himachal Pradesh)लिहिण्यात आले आहेत. धर्मशाला येथे होणाऱ्या विश्वचषक सामन्यांपूर्वी (ICC क्रिकेट विश्वचषक 2023) अशा प्रकारामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेसह प्रशासनाची चिंता आता वाढण्याची शक्यता आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी धर्मशाळेतील सरकारी विभागाच्या भिंतीवर स्प्रे पेंटने खलिस्तान जिंदाबाद लिहिले. मात्र, या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, नंतर ही घोषणा हटवण्यात आली. मात्र ही घोषणा अजूनही काही भिंतींवर दिसते.
    जलशक्ती विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तान जिंदाबादचा नारा लिहिण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काळ्या स्प्रे पेंटने ही घोषणा लिहिली होती. स्थानिक व्यक्तीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती.

    या घटनेची माहिती मिळताच आता हिमाचल प्रदेश पोलीस सक्रीय झाले असून डीएसपी वीर बहादूर आणि एएसपी हितेश लखनपाल आणि पोलिस स्टेशन धर्मशालाचे पथकही घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली. परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही झडती घेण्यात आली आहे.

    या घटनेमुळे आता विश्वचषक सामन्यांपूर्वी सुरक्षा यंत्रणांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. कांगडा एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.

    यापुर्वीही घडली आहे अशी घटना

    महत्त्वाचं म्हणजे, याआधी 7 मे 2022 रोजी धर्मशाला येथील विधानसभा संकुलाच्या भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनार्थ नारे लिहिण्यात आले होते आणि तेथे खलिस्तानचा झेंडाही लावण्यात आला होता. मात्र, नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.