आपको जल्द ही खत्म करेंगे…, दाऊदच्या टोळीकडून साध्वी प्रज्ञा यांना धमकीचा फोन

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या (Dawod Ibrahim) टोळीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. “आपको जल्ह ही खत्म कर देंगे...” अशी समोरुन धमकी दिली आहे. (You killed a threatening phone call from Dawood gang to Sadhvi Pragya) या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस (Police) धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेताहेत.

    भोपाळ : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत असलेल्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (MP sadhvi pragya singh thakur)  यांना धमकीचा फोन (Threatening phone call) आला आहे. दरम्यान, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या (Dawod Ibrahim) टोळीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. “आपको जल्ह ही खत्म कर देंगे…” अशी समोरुन धमकी दिली आहे. (You are about to be killed, a threatening phone call from Dawood gang to Sadhvi Pragya) या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस (Police) धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेताहेत.

    दरम्यान, साध्वी प्रज्ञा ह्या कडवट हिंदू आहेत, त्यामुळं धर्मावरुन त्या काही ना काही वक्तव्य करत असतात, काही दिवसांपूर्वी साध्वी यांनी पैगंबर मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांना पाठींबा दर्शवला होता. सत्य बोलणं बंडखोरी असेल तर आम्ही देखील बंडखोर आहोत असे साध्वी यांनी टि्वट केले होते. यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या कारणामुळं सुद्धा त्यांना धमकी येऊ शकते असा कयास लावला जात आहे.

    ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत लवकरच तुला लवकरच मारले जाईल’ अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरुन देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांने आपली ओळख सांगतली आहे. धमकीच्या फोनच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगसुद्धा असल्याचं साध्वी प्रज्ञा यांनी सांगितलं. त्यामुळे हा कॉल कुठुन आला, कोणत्या नंबरवरून आला याचा पोलीस तपास करताहेत. दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.