लष्कर-ए-तैयबा करतंय पाक आणि अफगाणमध्ये दहशतवादी छावण्या

अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबा तालिबानला अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी मदत करण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्याची हक्कानी नेटवर्कशी जवळीकही वाढली. मात्र, पाकिस्तान तालिबान आणि लष्कर यांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत, हे स्पष्ट झालेले नाही, कारण पाकिस्तानी तालिबान शरिया कायद्याची मागणी करत पाकिस्तानात हल्ले करत आहेत. भरती झालेल्या सैनिकांना नंतर अफगाणिस्तानच्या कुनार आणि नांगरहार प्रांतातील प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाठवले जाते. लष्करने अफगाणिस्तानच्या काही भागात आणि पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे अनेक नवीन दहशतवादी तळ उभारले आहेत. हक्कानी नेटवर्क आणि ISIS-K सारख्या दहशतवादी संघटना त्याला मदत करत असल्याचे मानले जाते.

    मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेली लष्कर-ए-तैयबा (एलईटी) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर या दहशतवादी संघटनेचा उत्साह अधिक आहे. मीळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तैयबाने अलीकडेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामध्ये नवीन दहशतवादी तळ तयार केले आहेत. यामध्ये शेकडो दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या कामात लष्करला हक्कानी नेटवर्क आणि इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान (ISIS-K) यांचीही मदत मिळत असल्याचे मानले जात आहे.

    डेली सिख वेबसाइटच्या अहवालानुसार, लष्करने अफगाणिस्तानच्या काही भागात आणि पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे अनेक नवीन दहशतवादी तळ उभारले आहेत. हक्कानी नेटवर्क आणि ISIS-K सारख्या दहशतवादी संघटना त्याला मदत करत असल्याचे मानले जाते. 2008 च्या मुंबई हल्ल्यात लष्कर या संघटनेनेच 160 लोक मारले होते. मृतांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. यानंतर या दहशतवादी संघटना आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढला होता. हाफिज सईद सध्या पाकिस्तान सरकारच्या नजरकैदेत आहे.

    अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबा तालिबानला अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी मदत करण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्याची हक्कानी नेटवर्कशी जवळीकही वाढली. मात्र, पाकिस्तान तालिबान आणि लष्कर यांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत, हे स्पष्ट झालेले नाही, कारण पाकिस्तानी तालिबान शरिया कायद्याची मागणी करत पाकिस्तानात हल्ले करत आहेत. भरती झालेल्या सैनिकांना नंतर अफगाणिस्तानच्या कुनार आणि नांगरहार प्रांतातील प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाठवले जाते.

    मुंबई हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान सरकारवर प्रचंड दबाव होता. दिखावा करण्यासाठी काही कारवाईही करण्यात आली, पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. याचे कारण म्हणजे लष्कर हे पाकिस्तान सरकार, लष्कर आणि कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था आयएसआय यांच्या सहकार्याने कार्यरत आहे.