
राजधानी दिल्लीमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षी या दिवशी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली- आज ७४ व्या प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. राजधानी दिल्लीमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षी या दिवशी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। इस बार का यह अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि इसे हम आजादी के अमृत महोत्सव के दौरान मना रहे हैं। देश के महान स्वतंत्रता सेनानियों के सपनों को साकार करने के लिए हम एकजुट होकर आगे बढ़ें, यही कामना है।
Happy Republic Day to all fellow Indians!
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
PM मोदींकड़ून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया” “गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। इस बार का यह अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि इसे हम आजादी के अमृत महोत्सव के दौरान मना रहे हैं। देश के महान स्वतंत्रता सेनानियों के सपनों को साकार करने के लिए हम एकजुट होकर आगे बढ़ें, यही कामना है” असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हटलय.
मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
तर दुसरीकडे आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. विधान भवनात देखील ध्वजारोहण करण्यात आला आहे. ध्वजारोहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. आज कर्तव्य पथावर एकूण 23 चित्ररथ दिसतील. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत-बाह्य सुरक्षेच दर्शन या चित्ररथांमधून होईल. यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 17 चित्ररथ असतील. त्याशिवाय वेगवेगळी मंत्रालय आणि विभागांचे सहा चित्ररथ असतील.