कधी भांडी घासली, कधी मजुरी, कधी सूत कातणं, मुलांच्या शिक्षणासाठी सदैव झटत राहिल्या हिराबेन मोदी!

हिराबेन यांनी मुलांची फी भरण्यासाठी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे. त्यासाठी त्यांनी अनेक काम केलीत.

    गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या आई हिराबेन (Heeraben Modi )  यांनी आज वयाच्या 100 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. हिराबेन यांच्या आयुष्याचा प्रवास खडतर होता. त्यांना जीवनात संघर्ष करावा लागला. स्वत अशिक्षीत असल्या तरी त्यांनी मुलांना चांगल शिक्षण देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. कसा होता त्यांचा जीवनप्रवास जाणुन घेऊया.

    पंतप्रधान मोदी यांनी आईला श्रद्धांजली देत त्यांच्या म्हण्टलं की, ‘एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावलाय…आईमध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे.

    हिराबेन यांचा जीवनप्रवास

    हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. हिराबेन यांचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15 ते 16 वर्षाच्या होत्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करण्यासही होकार दिला. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे. त्यासाठी त्यांनी अनेक काम केलीत.

    घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्याचे काम

    हिराबेन केवळ घरातील सर्व कामे स्वतःच करत नव्हत्या, तर आर्थिक उत्पन्नासाठी देखील काम करत होत्या. त्या काहींच्या घरी धुणीभांडी करायच्या आणि घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्यासाठी वेळ काढायच्या. हिराबेन यांनी त्यांच्या जीवनात अनेक दैनंदिन संकटांना तोंड दिले आणि यशस्‍वीपणे मात केली.