
संसदेच्या बोलावलेल्या सरकार कधीही लोकसभा (Loksabha Election) विसर्जित निवडणुकीची शिफारस करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या बोलावलेल्या सरकार कधीही लोकसभा (Loksabha Election) विसर्जित निवडणुकीची शिफारस करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation One Election) यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने आपला निवडणूक प्रचार पूर्णपणे लोकसभा निवडणुकीवर केंद्रित केला आहे. हे विशेष.
लोकसभेची तयारी सुरू असल्याचा पुनरुच्चार भाजपा विविध व्यासपीठांवरून सातत्याने करीतही आहे. अशा स्थितीत देशातील सुमारे डझनभर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता दाट झाली आहे. या निवडणुकीमुळे भाजपानेही प्रादेशिक पक्षांचा मग तो त्यांच्याच पक्षाचा असो वा प्रादेशिक पक्षाचा प्रभाव कमी करण्याची तयारी केली असल्याचेही दिसत आहे.
संभाव्य 12 राज्ये
(राज्य आणि विधानसभा, लोकसभा जागा अनुक्रमे)
राज्य – महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम, ओडिशा, आंध्रप्रदेश, सिक्किम, अरुणाचल
विधानसभा – 288, 200, 230, 90, 119, 40, 147, 175, 32, 40
लोकसभा – 48, 25, 29, 11, 17, 01, 21, 25, 01, 01