संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आगामी लोकसभा (Loksabha) आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने तयारीला वेग दिला असून, यंदा लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणुका सोबत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नवी दिल्ली : आगामी लोकसभा (Loksabha) आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने तयारीला वेग दिला असून, यंदा लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणुका सोबत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय (Election Employee) अन्य कामे देऊ नका, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. याबाबतचे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जारी केले आहेत.

    कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय इतर जबाबदारी नको

    केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना एक आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवालही तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

    महाराष्ट्र-हरियाणात तयारीला वेग

    महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेची मुदत ऑक्टोबर 2024 मध्ये संपणार आहे. तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल निवडणूक आयोगाच्या 2024 मध्ये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र तसेच अधिकाऱ्यांना कोणतीही हरयाणातील विधानसभा विसर्जित करून दोन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे.

    मतदार याद्या तयार करणे सुरू

    राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.