अयोध्येत रामभक्तांची रीघ, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रात्रीपासून लांबच लांब रांगा!

सोमवारी उद्घाटन झाल्यापासून अयोध्येत रात्री उशिरापासूनच राम मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. पहाटे 2 वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली.

  अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी (22 जानेवारी) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या उपस्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा (Ram Mandir Inauguration) पार पडला. आता उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशी पासूनच अयोध्येत भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. रात्री उशीरापासूनच हजारो लोक मंदरिराबाहेर जमू लागले आहेत.

  अनेक बडे नेते, राजकारणी, खेळाडू, सेलेब्रिटी यांच्या उपस्थितीत काल राम मंदिराचं उद्घाटन पार पडलं. रामललाच्या अभिषेकनंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या हजारो भाविकांना कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर मंदिरात पोहोचून रामललाचे दर्शन घ्यायचे आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळपासूनच श्री रामजन्मभूमी येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत

  सोमवारी उद्घाटन झाल्यापासून अयोध्येत रात्री उशिरापासूनच राम मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. पहाटे 2 वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करत आहेत. देशभरातून भाविकांची जमवाजमव सुरू आहे. यासोबतच अयोध्येतील स्थानिक रहिवासीही राम मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी पोहोचत आहेत.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच केलं उद्घाटन

  22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, रणवीर कपूर, आलिया भट्ट, साऊथ सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते