The vision of Lord Krishna in a dream; Krishna's temple built by Muslims at a cost of 40 lakhs

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत सध्या खूप चर्चेत आहे. राज्यात पंचायत निवडणुकीच्या तोंडावर भगवाना श्रीकृष्णाने कुडाणा गावात सरपंचाची निवड केली. या ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही निवडणूक न होता सरपंच निवडून आला(Lord Krishna elected Sarpanch).

    भोपाळ : मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत सध्या खूप चर्चेत आहे. राज्यात पंचायत निवडणुकीच्या तोंडावर भगवाना श्रीकृष्णाने कुडाणा गावात सरपंचाची निवड केली. या ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही निवडणूक न होता सरपंच निवडून आला(Lord Krishna elected Sarpanch).

    मिळालेल्या माहितीनुसार, कुडाणा आणि वजीरपूर ही दोन गावे ग्रामपंचायत दस्तखेडीपासून वेगळी करुन नवीन पंचायत कुडाणा निर्माण करण्यात आली. येथून सरपंचपदासाठी 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीपूर्वी गावात प्रथमच बिनविरोध सरपंच होणार, असा निर्णय संपूर्ण गावाने घेतला.

    ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी सर्व दावेदारांना भगवान कृष्णाच्या मंदिरात एकत्र आणले आणि सर्व 6 उमेदवारांच्या नावाच्या चिट्ट्या तयार केल्या आणि 3 वर्षीय मुलीकडून एक चिट्टी उचलण्यात आली.

    मुलीने उचललेल्या चिठ्ठिमध्ये सीताबाई प्रेम नारायण सौराष्ट्र असे नाव दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी सीताबाई प्रेम नारायण यांची सरपंच म्हणून एकमताने निवड केली. तर इतर सर्व उमेदवारांनी तात्काळ तहसील गुलाना येथे जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. कुडाणामध्ये एकूण 1200 मतदार असून एकूण 10 वॉर्ड आहेत.

    सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून, सरपंचपदासाठी 6 उमेदवार होते. मात्र शुक्रवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता इथे सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली.