बायकोसाठी काय पण… कोरोनामध्ये पत्नी गमावली आणि आता तिचा सिलिकॉनचा पुतळा बनवला, हिरेजडित व दागिन्यानी तयार केलेल्या पुतळ्याची किंमत माहित का? ऐकून बसेल धक्का…

तापसही पत्नीप्रमाणे या पुतळ्याची काळजी घेताहेत. दररोज ते तिला कपडे घालतात, सोन्याचे दागिने घालतात आणि तिच्याशी बोलतात. तापसचे पत्नी आणि इंद्राणीच्या पुतळ्यावरील प्रेम हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शहरातील कैखली भागात राहणारा तापस हे निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत.

    कोलकाता- मार्च २०२० नंतर देशाता कोरोनाने हाहाकार माजवला. कोरोनाच्या या संकटामुळं होत्याचे नव्हते झाले. कित्येकांचे संसार बुडाला, उद्योगधंदे, रोजगार गेले, व्यवसाय बंद झाले कोरोनाचा सगळ्याच ठिकाणी परिणाम झाला. कोरोनाने लाखो लोकांचे जीव घेतले. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलकातामधील एका 65 वर्षीय तापस शांडिल्य यांची पत्नीचा मृत्यू झाला. त्यांचे पत्नीवर जीवापाड प्रेम होते. मात्र पत्नी अचानक गेल्याने तापस शांडिल्य यांच्या आभाळ कोसळले. म्हणून त्यांनी पत्नी आठवणीसाठी चक्क त्यांनी लाखो रुपये खर्च करुन सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे. त्यांची पत्नी इंद्राणी हिचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. यानंतर तापस यांनी पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी तब्ब्ल अडीच लाख रुपये खर्च करुन हा सुंदर पुतळा तयार केला आहे.

    दरम्यान, तापसही पत्नीप्रमाणे या पुतळ्याची काळजी घेताहेत. दररोज ते तिला कपडे घालतात, सोन्याचे दागिने घालतात आणि तिच्याशी बोलतात. तापसचे पत्नी आणि इंद्राणीच्या पुतळ्यावरील प्रेम हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शहरातील कैखली भागात राहणारा तापस हे निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत. तापस सांगतात की, आम्ही १० वर्षांपूर्वी पत्नीसह मायापूरमधील इस्कॉन मंदिरात गेलो होता. येथे दोघेही भक्तिवेदांत स्वामींची जिवंत मूर्ती पाहिली, ज्याने आम्ही खूप प्रभावित झालो. तेव्हा इंद्राणीने तापसला सांगितले की, जर मी मेले तर तू यांचासारखाच माझा पुतळा बनवून घे.

    पुतळ्याची एवढी आहे किंमत?

    तापस यांच्या पत्नी इंद्राणी यांचा 4 मे 2021 रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेने तापसला हादरवून सोडले. त्यानंतर तापसने आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंटरनेटवर सिलिकॉनच्या मूर्ती बनवणाऱ्या लोकांचा शोध सुरू केला. आणि ६ महिन्यांत अडीच लाख रुपयांत मूर्ती बनवून घेतली. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी आणि अडीच लाख रुपये खर्च झाले. आता जो कोणी तापसच्या घरी येतो त्याला वाटत नाही की इंद्राणी आता त्याच्यासोबत नाही. या पुतळ्याचे वजन 30 किलो आहे, तापस त्याच्या पत्नीप्रमाणे सोन्याचे दागिने घालतो. तापस सांगतात की, सुरुवातीला माझे अनेक नातेवाईक या निर्णयाच्या विरोधात होते. जरी नंतर सर्वांनी माझ्या आग्रहापुढे नतमस्तक झाले.