लखनऊत दलित डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास नकार; तोंडावर थुंकले, शिवीगाळ करून मारहाण

कुटुंबीयांसह मिळून डिलिव्हरी बॉयलाही बेदम मारहाणही केली. (Delivery Boy Beaten By Customer)  एवढ्यावरच या ग्राहकाचे समाधान झाले नाही तेव्हा तो त्याच्या चेहऱ्यावर थुंकलासुद्धा. ही संपूर्ण घटना आशियाना भागातील आहे.

    नवी दिल्ली – शनिवारी रात्री लखनऊमधील (Lucknow )झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाने जेवण घेण्यास नकार दिला. कारण काय, तर डिलिव्हरी बॉय ( Dalit Delivery Boy) दलित होता. डिलिव्हरी बॉय दलित असल्याचे ग्राहकाला समजताच त्याने जेवण घेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.

    एवढेच नाही तर कुटुंबीयांसह मिळून डिलिव्हरी बॉयलाही बेदम मारहाणही केली. (Delivery Boy Beaten By Customer)  एवढ्यावरच या ग्राहकाचे समाधान झाले नाही तेव्हा तो त्याच्या चेहऱ्यावर थुंकलासुद्धा. ही संपूर्ण घटना आशियाना भागातील आहे. डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 ज्ञात, 12 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला( Case Registers Against 14 People) आहे. मात्र, हे प्रकरण केवळ मारहाणीचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

    आशियाना येथे राहणारा विनीत रावत झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय आहे. शनिवारी रात्री त्याला आशियानामध्येच अजय सिंह नावाच्या ग्राहकाला डिलिव्हरी देण्यासाठी पाठवले होते. तो डिलिव्हरी घेऊन गेला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विनीतने आरोप केला आहे की, त्याने अजय सिंगला त्याचे नाव विनीत रावत असल्याचे सांगितले. यावर तो संतापला. तो शिवीगाळ करत म्हणाला– आता आम्ही तुझ्यासारख्यांनी शिवलेले सामान घ्यावे का? त्यावर तो त्याला म्हणाला, तुम्हाला जेवण घ्यायचे नसेल तर कॅन्सल करा, पण शिवीगाळ करू नका.”

    यावर त्याने आधी फूड पॅकेट फेकले, नंतर तोंडावर तंबाखू थुंकली. विनीतने विरोध केला असता अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली. विनीतने कशीबशी सुटका करून पोलिसांना माहिती दिली. थोड्या वेळाने डायल-112 ची टीम आली, विनीतला त्याची गाडी मिळाली आणि त्याला पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले.