तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. चंदीगडहून फॉरेन्सिक टीम तपासासाठी लुधियानाला रवाना झाली आहे. एनआयएच्या तपासासाठी चंदीगडहून एनआयएचे दोन सदस्यीय पथकही रवाना झाले आहे. एनआयएची टीम पंजाब पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमसोबत तपास करणार आहे. हे दहशतवादी संघटनांचे कृत्य तर नाही ना हेही पाहिले जाईल. यामध्ये दहशतवादी कनेक्शन आढळल्यास एनआयए तपास हाती घेईल.
पंजाबमधील लुधियाना येथील न्यायालयात आज गुरुवारी स्फोट झाला. न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला आणि त्यामुळे भिंत कोसळली. यात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी लुधियाना येथे पोहोचण्याच्या काही वेळापूर्वी हा स्फोट झाल्याने विवीध चर्चांना उधाण आलं आहे.
तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. चंदीगडहून फॉरेन्सिक टीम तपासासाठी लुधियानाला रवाना झाली आहे. एनआयएच्या तपासासाठी चंदीगडहून एनआयएचे दोन सदस्यीय पथकही रवाना झाले आहे. एनआयएची टीम पंजाब पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमसोबत तपास करणार आहे. हे दहशतवादी संघटनांचे कृत्य तर नाही ना हेही पाहिले जाईल. यामध्ये दहशतवादी कनेक्शन आढळल्यास एनआयए तपास हाती घेईल.
या स्फोटामुळे संपूर्ण न्यायालयाची इमारत हादरली. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटाबाबत पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतिही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. कोर्टात गोंधळाचे वातावरण आहे. आज वकिलांच्या संपामुळे सामान्य दिवसांच्या तुलनेत गुरुवारी येथे गर्दी कमी होती.
वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस दलाने न्यायालय परिसराला चारही बाजूंनी वेढा दिला आहे. हाय अलर्ट जारी करून संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हेही आज जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी शहरात पोहोचले आहेत.