दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन, समुपदेशन केंद्रे बंद करण्याच्या घाट

आज हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी दिल्ली येथील जनपथ रोडवरील राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

    दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील १९१ आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या वतीने बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पंधरा ते वीस वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी दिल्ली येथील जनपथ रोडवरील राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

    महाराष्ट्रामध्ये ५१२ एचआयव्ही समुपदेशन केंद्र आहेत. त्यापैकी १९१ समुपदेशन केंद्रे बंद करण्याच्या घाट केंद्र सरकारने घातलेला आहे. पंधरा ते वीस वर्षांपासून समुपदेशन केंद्रामध्ये एक समुपदेशक व एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे काम करतात. हे केंद्र बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणून आज दिल्ली येथील जनपथ रोडवरील राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यालयाच्या समोर हजारोच्या संख्येने हे कर्मचारी आंदोलन करत आहे.