भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिला; सलग तिसऱ्या वर्षी राज्याचं नाव कायम…!

महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे (Corruption in Maharashtra) आकडे नागरिकांची चिंता वाढवणारे आहेत. कारण देशातील सर्वांत जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात होत असल्याची माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) अहवालातून समोर आली आहे.

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे (Corruption in Maharashtra) आकडे नागरिकांची चिंता वाढवणारे आहेत. कारण देशातील सर्वांत जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात होत असल्याची माहिती ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या (NCRB) अहवालातून समोर आली आहे. सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यांमध्ये 2022 मध्ये महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे.

    राज्यात भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना आणि कायदा अमलात आणला आहे. यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. 2021 मध्ये 773 तर 2020 मध्ये 664 भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 12 प्रकरणे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असण्याची संबंधित आहेत.

    प्रकरणे किती निकाली काढली?

    महाराष्ट्रातील 1,507 भ्रष्टाचाराची मागील प्रकरणातील चौकशी अद्याप प्रलंबित आहे. केवळ सात प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर करण्यात आला तर 497 प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याचवेळी देशभरातील 11,142 भ्रष्टाचाराची प्रलंबित असून, त्यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.