महात्मा गांधीचं जन्मस्थळ कीर्ती मंदिर मोडकळीस, बंद करण्याची ओढवलीये वेळ, साबरमती आश्रमाचं मात्र 1200 कोटींमध्ये नूतनीकरण

    जगाला अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांची आज जयंती (Mahatma Gandhi Birth Anniversary) आहे. आज देशभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. गुजरातमधील अहमदाबातच्या साबरमती आश्रमात  (Sabarmati ashram)मोठ्या लोकं त्यांना नमन करण्यासाठी येत आहे. साबरमती आश्रमाप्रमाणे पोरबंदर येथे असलेलं बापूंच जन्मस्थळ किर्ती मंदीरात (mahatma gandhi birthpalce kirti mandir) देखील मोठ्या प्रमाणावर लोकं  भेटी देतात. मात्र, माहात्मा गांधीच हे जन्मस्थळ आता मोडकळीस आलं असून पुरातत्व विभागाने त्याला दुरुस्त करण्याऐवजी त्याला कुलूप ठोकलं आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांचा चांगलाच हिरमोड होत आहे, तर दुसरीकडे दुसरीकडे, अहमदाबादच्या ज्या साबरमती आश्रमात राहून बापूंनी स्वातंत्र्य चळवळ चालवली होती त्याचे सुमारे १२०० कोटी रुपये खर्चातून नूतनीकरण होत आहे.
    महात्मा गांधी म्हणाले होते, “माझे जीवनच माझा संदेश आहे.’ त्यांची भारताबाहेर जगात अनेक स्मारके आहेत, मात्र पोरबंदर येथील त्यांचे जन्मस्थळ मोडकळीस आले आहे. पुरातत्त्व खात्याने (एएसआय) त्याची दुरुस्ती करण्याऐवजी कुलूप ठोकले आहे. दुसरीकडे, अहमदाबादच्या ज्या साबरमती आश्रमात राहून बापूंनी स्वातंत्र्य चळवळ चालवली होती त्याचे सुमारे १२०० कोटी रुपये खर्चातून नूतनीकरण होत आहे.
    या दुर्लक्षामुळे पोरबंदरमधील जन्मस्थळ कीर्ती भवन पाहण्यासाठी रोज ४००-५०० लोक येतात, तर साबरमती आश्रमात ३ हजारांहून जास्त लोक येतात. बापूंच्या जन्मस्थळ भवनाच्या दर्शनासाठी जन्मस्थळावर येणाऱ्या लोकांना निराश व्हावे लागत आहे. राजस्थानच्या कोटाहून पोरबंदरला आलेल्या रामसिंह यांच्याबाबत असेच घडले. रामसिंह म्हणाले, गांधीजींचे जन्मस्थळ पाहण्यासाठी राजस्थानमधून पोरबंदला आलो. बापूंच्या जन्मस्थळाच्या दर्शनाची माझी अनेक दशकांपासूनची इच्छा होती, मात्र येथे फक्त एक कक्ष (खोली) पाहू शकलो. इमारतीचा उर्वरित भाग मोडकळीस अाल्याने जाऊ शकलो नाही.
    पोरबंदर एएसआय राजकोट सर्कलअंतर्गत येते. राजकोट सर्कल अभियंता हर्षद सुतारिया यांच्या म्हणण्यानुसार, गांधी जन्मस्थळाची इमारत गेल्या दीड वर्षापासून मोडकळीस आल्याने बंद केली आहे. आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून लवकरच टेंडर जारी करून दुरुस्ती करणार आहोत. आतापर्यंत काम सुरू करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू होती