एनआयएची मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, 13 जण संशयित ताब्यात

एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएनं देशभरात 44 जागांवर धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय.

    मुंबई : एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएनं देशभरात 44 जागांवर धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.

    एकाच वेळी छापेमारी

    राष्ट्रीय तपास संस्थेला अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा भाईंदर यासह कर्नाटकात कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघात कारवाई सुरु आहे. एकूण ठाणे ग्रामीणमधील ३९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. पुणे शहरात दोन ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत काही लोकांना ताब्यात घेतले आहे. भिवंडीच्या पडघ्यामुळे काही दिवसांपूर्वी एनआयने कारवाई केली होती.

    एनएनएनला मोठे यश

    एनआयएने छापेमारी दरम्यान अतिरेक्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, इसिसचे हँडलर्स या सर्वांचा पर्दाफाश केला आहे. देशभरात दहशवादी कारवाया करण्याचा कट उद्ध्वस्त केला आहे. देशात इसिसची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखला होता. पुणे शहरातून हे नेटवर्क चालत होते. या नेटवर्कमधील सहभागी अतिरेक्यांनी आयईडी तयार केले होते. पुणे शहरातील कोंढव्यामधील एका घरात आयईडी असेंबल केले होते. तसेच या दशतवाद्यांनी साताऱ्याच्या जंगलात त्याची चाचणी केली होती. या प्रकरणात मोहम्मद शहनवाज ऊर्फ शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि तालाह लियाकत खान यांना अटक केल्यानंतर एनआयएला धक्कादायक माहिती मिळाली होती.