file phot
file phot

रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली आहे.  जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    जम्मू काश्मीरमधून एक महत्त्वाची बातमी समोर  येत आहे.  गुरुवारी राजौरी (Rajauri attack News)जिल्ह्यातील थन्ना मंडी येथील नीली चौकी येथे असलेल्या लष्करी छावणीवर एका मेजरने केलेल्या गोळीबार आणि ग्रेनेड स्फोटात तीन अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर रात्री 11 वाजता आरोपीला पकडण्यात आले.
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर रँक आर्मी ऑफिसरने गुरुवारी शूटिंग सराव सत्रादरम्यान आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला आणि नंतर तो युनिटच्या शस्त्रागारात जाऊन लपला. कमांडिंग ऑफिसर, त्याच्या डेप्युटी आणि मेडिकल ऑफिसरसह, शरण येण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नात इमारतीजवळ आले तेव्हा त्यांनी ग्रेनेड फेकले.
    यात तिन्ही अधिकारी जखमी झाले. युनिटच्या सेकंड-इन-कमांडची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी अधिकाऱ्याला शस्त्रागारात ताब्यात घेण्यापूर्वी सुमारे आठ तास परिस्थिती तणावपूर्ण होती. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने शस्त्रागाराजवळील गाव रिकामे केले आहे.

    लोकांना  वाटत होता हा दहशतवादी हल्ला

    दुपारी गोळीबाराचा आवाज ऐकून लोक हादरले. या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दहशतवादी घटनांमुळे चर्चेत असलेल्या राजौरी जिल्ह्यातील लोकांनी हा दहशतवादी हल्ला समजून आपापल्या घराकडे वाटचाल सुरू केली. लोक बराच वेळ आपापल्या घरात लपून राहिले. हा दहशतवादी हल्ला नव्हता हे नंतर स्पष्ट झाले. दुसरीकडे प्रकरण गांभीर्याने घेत ठाणेमंडी आणि रोमियो फोर्सचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    घटनेचा तपास सुरू

     राजौरी येथील लष्करी छावणीत झालेल्या ग्रेनेड अपघातात एक अधिकारी जखमी झाल्याचा दावा लष्कराने केला आहे. लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्स, येथे पोस्ट अधिकाऱ्याला बाहेर काढण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.