जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला ; नगरसेवकांच्या बैठकीवर झालेल्या हल्ल्यात एका PSOसह दोघांचा मृत्यू

सोपोरमध्ये झालेल्या हल्ल्यात बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे .फरीदा खान या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. फरीदा खान यांना परिसरातीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

    जम्मू : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या सोपोरमधील लोन बिल्डिंगमध्ये सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात BDC सदस्यांसह PSO जखमी झाले. हल्ल्यानंतर पळून जाताना दहशतवाद्यांनी काऊन्सिलरवर फायरिंग केलं. तिथे तैनात असलेल्या एका PSOने दहशतवाद्यांना प्रतुत्तर देण्याचा प्रयत्न केला पण ते दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले. त्यावेळी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

     

    सोपोरमध्ये झालेल्या हल्ल्यात बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे .फरीदा खान या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. फरीदा खान यांना परिसरातीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .या हल्ल्यात किती दहशतवादी सहभागी होते याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. दहशतवादी त्याच परिसरात लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दलांचनी नाकाबंदी करत शोधमोहीम हाती घेतलीय.