मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसची धुरा व्यवस्थित सांभाळतील – मनीष तिवारी

मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या आयुष्यातील 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेसच्या सेवेसाठी घालवला आहे. त्यामुळेच सुरक्षित हातांमध्ये काँग्रेस पक्षाची धुरा असायला हवी. खर्गे हे काँग्रेसचा व्यवस्थित धुरा सांभाळतील अशा विश्वास मनीष तिवारी (manish tiwari) यांनी व्यक्त केला आहे.

    नवी दिल्ली – काँग्रेस पक्षातील अध्यक्षपद अनेक महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळं येत्या 17 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. (congress president election) तर 19 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी आधीच नकार दिला आहे. त्यामुळं तब्बल 22 वर्षांनंतर देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेकजण शर्यतीत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) आणि शशी थरुर (shashi tharoor) हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

    दरम्यान, या निवडणुकीत खर्गे यांना पाठिंबा मिळताना दिसतोय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय यांनीही मल्लिकार्जुन खर्गे यांना समर्थन दर्शविताना आपलं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मागं घेतलं आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या आयुष्यातील 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेसच्या सेवेसाठी घालवला आहे. त्यामुळेच सुरक्षित हातांमध्ये काँग्रेस पक्षाची धुरा असायला हवी. खर्गे हे काँग्रेसचा व्यवस्थित धुरा सांभाळतील अशा विश्वास मनीष तिवारी (manish tiwari) यांनी व्यक्त केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या सर्वात खालच्या पदापासून काम केले आहे, त्यामुळे त्यांचा अनुभवसुद्धा दांडगा आहे. असं म्हणत मनीष तिवारी (manish tiwari) यांनी खर्गे यांचे कौतुक केलं. तसेच आपले समर्थन खर्गे यांनी असल्याचं तिवारींनी म्हटलं आहे.