पुढील आठवड्यात सोनियांना भेटणार ममता, विखुरलेल्या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार

ममता या बुधवारी दिल्लीत टीएमसी खासदारांची भेट घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतील. तसेच त्या शुक्रवारी सोनियांना भेटणार आहेत. शनिवारी ममता तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची देखील विशेष भेट घेणार आहेत.

    नवी दिल्ली – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झालेले मतभेद आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे अडचणीत आलेले विरोधक पुन्हा एकदा एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. याची सुरुवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी करणार आहेत. त्या पाच दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहे. त्यांच्या पुढाकाराने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणा राष्ट्र समितीचे केसीआर, सपा नेते अखिलेश यादव, आप नेते अरविंद केजरीवाल आणि द्रमुक नेते एमके स्टॅलिन एका व्यासपीठावर येऊ शकतात. या पक्षांचे लोकसभेत सुमारे 125 खासदार आहेत.

    ममता या बुधवारी दिल्लीत टीएमसी खासदारांची भेट घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतील. तसेच त्या शुक्रवारी सोनियांना भेटणार आहेत. शनिवारी ममता तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची देखील विशेष भेट घेणार आहेत.

    त्याच दिवशी त्या एक यादीही जाहीर करणार आहेत. ही यादी त्या नेत्यांची असेल, ज्यांच्यावर तपास यंत्रणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा अप्रत्यक्ष मदत करण्यास सहमती दिल्यानंतर त्यांच्यावर होणारी कारवाई थांबवली होती. त्याच वेळी, टीएमसीच्या सूत्रांच्या मते, शिक्षक घोटाळ्यात ज्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर गाजले ते मंत्री आणि टीएमसीचे संस्थापक सदस्य पार्थ चॅटर्जींच्या जवळच्यांवर झालेल्या ईडीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पैशांबाबत ममता या बॅकफूटवर होत्या.