अशा प्रेमाचा नेहमीच गळा घोटला जातो, रेल्वे रुळांवर पडलं होतं त्याचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच अनेकांना झाले अश्रू अनावर

त्या तरूणाने आपला मृत्यू होण्यापूर्वी भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. "मी जीवन संपवतोय पण माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या आपल्या बाळाला नक्की जन्म दे" असं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.

  झांसी (उत्तर प्रदेश) : फादर्स डे (Fathers Day) ला सर्वांनीच आपल्या वडिलांसाठी काही ना काही स्पेशल केलं असेल. यावेळी सर्व वडिलांनाही बरं वाटलं असेल. अंतर असं नशीब प्रत्येकाचंच असेल असं नाही. उत्तर प्रदेशमधील (UP) झांसी शहरातून नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एका युवकाचं शव (Body of man) रेल्वे रुळावर काही लोकांना दिसलं. मात्र त्या युवकाच्या खिशातील चिठ्ठी (Note) वाचून सर्वच गहिवरले.

  मिळालेल्या माहितीनुसार, झाशी स्टेशनजवळील (Jhansi railway station) बाहेरील भागात ही घटना घडली. एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

  एक सुसाइड नोटही (Suicide Note) सापडली होती, ज्यात त्या तरूणाने आपला मृत्यू होण्यापूर्वी भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. “मी जीवन संपवतोय पण माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या आपल्या बाळाला नक्की जन्म दे” असं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.

  हा तरुण हिंदू (Hindu) असून एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. दोघांनी गुपचूप लग्नही केलं होतं. या नात्याला समाज आणि कुटुंबामध्ये मान्यता नव्हती, यामुळे त्या तरूणानं हे पाऊल उचललं. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी भूपेंद्र यादव अशी पोलिसांनी या युवकाची ओळख पटवली आहे. त्यानं चिठ्ठीमध्ये आपल्या पत्नीचं नाव मरियम बानो असे लिहिलं आहे.

  युवकानं चिठ्ठीत लिहिली अंतिम इच्छा

  मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझी चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझ्या विनंतीनुसार आपल्या मुलाला जन्म द्यावा हीच विनंती. मी इथून जात आहे, पण मी नेहमी तुझ्या मनात आहे. माझ्या मरणानंतर पुन्हा लग्न करू नकोस” असं या चिठ्ठीत म्हटलं आहे. युवकाच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  man end his life as parents not accepting love of different religion in up