man with tiranga

‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिमेअंतर्गत देशभरात विविध ठिकाणी तिरंगा फडकवण्यास सुरुवात झाली आहे. हरिद्वारमध्ये एक व्यक्ती गंगा नदीच्या आत तिरंगा ध्वज फडकवताना दिसला. नदीतील ध्वजारोहणाचा हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर लोकांच्या आवडीचा विषय बनला आहे.

    भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही मोहीमेला आता सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ दिवसांपूर्वी भारतीय तटरक्षक दलाने खोल समुद्रात जाऊन तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आता हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगा नदीच्या मधोमध एक व्यक्ती तिरंगा (Flag Hoisting Video) ध्वज फडकवतानाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत देशभरात विविध ठिकाणी तिरंगा फडकवण्यास सुरुवात झाली आहे. हरिद्वारमध्ये एक व्यक्ती गंगा नदीच्या आत तिरंगा ध्वज फडकवताना दिसला. नदीतील ध्वजारोहणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांच्या आवडीचा विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये हरिद्वारमधील हर की पौरी घाटावर गंगा नदीमध्ये या व्यक्तीने हातात तिरंगा घेतला आहे. ती व्यक्ती प्रवाहासोबत पोहत पुढे जाताना दिसत आहे. त्या व्यक्तीला पाहण्यासाठी घाटावर गर्दी जमा झाली होती.

    हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या माणसाचे कौतुक केले आहे.