hackers

राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर (Thane Police Website Hack) झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी (Cyber Attack) चौकशी सुरु करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. सध्या ठाणे पोलिसांची वेबसाईट रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे.

  भारतातल्या अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपने जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक (Cyber Attack) करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम धर्मियांची माफी मागण्याचा संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर दिला आहे.

  या ग्रुपनं ‘opspatuk’ किंवा प्रतिहल्ला (StrikeBack) हे ऑपरेशन सुरू केलं आहे. त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक (Website Hack) झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हा एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाऊ शकते.

  गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिर-मशीद मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावरील टिप्पणीमुळं देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याची वक्तव्य केली आहेत.

  दरम्यान, राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. सध्या ठाणे पोलिसांची वेबसाईट रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे.

  ठाणे शहर पोलिसांच्या (Thane Police) अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या संदेशात याची नोंद करण्यात आली आहे. हॅकर्सनी लिहिलं आहे की, “भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.”

  दोन दिवसांपूर्वी इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स (Institute Of Science) शासकीय विज्ञान महाविदयालयाची वेबसाईट हॅक झाली होती. याची जबाबदारीही ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेन (Dragon Force Of Malsiya) घेतल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. यात भारताविरुद्ध मोहीमेचा (anti India campaign) भाग म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेजचा त्या वेबसाईटवर उल्लेख करण्यात आला आहे.