US H1B Visa

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. व्हिसा (Visa) अर्जदारांची संख्या इतकी जास्त वाढली आहे की अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागतंय.

    कोरोना काळात (Corona) अमेरिकेने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या व्हिसासंबंधी अटी थोड्या कडक करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर अटींमध्ये शिथिलता येत आहे. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. व्हिसा (Visa) अर्जदारांची संख्या इतकी जास्त वाढली आहे की अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागतंय.

    मुंबईतील (Mumbai) बीकेसी परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर हजारो लोकांची गर्दी असते. या लोकांकडून अमेरिकेला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये व्हिसासाठी अर्ज करण्यात आला आहे. व्हिसा मिळवण्यासाठी हे अर्जदार कित्येक महिने वाट पाहत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाने व्हिसासाठीच्या मुलाखतीच्या प्रक्रियेची गती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

    अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे प्रमुख जॉन बॅलार्ड म्हणाले की, कोरोना संकटानंतर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. व्हिसा अर्जदारांना अमेरिकेत जाऊन अभ्यास, पर्यटन, कुटुंबीयांची भेट, नातेवाईकांची भेट आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे. कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर व्हिसा अर्जदारांची संख्या इतकी जास्त आहे की प्रतीक्षा कालावधी अनेक महिन्यांचा झाल्याचं दिसतोय. जो कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

    भारतात व्हिसा मुलाखतीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतातील व्हिसा अर्जदारांमध्ये विद्यार्थी, कर्मचारी, अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक प्रवासी आणि मर्चंट नेव्हीचे क्रू सदस्य यांचा समावेश आहे. व्हिएतनाम, वॉशिंग्टन येथून कॉन्सुलर अधिकाऱ्यांना भारतात परत बोलावले जात आहे. जेणेकरून व्हिसा प्रक्रियेत अतिरिक्त मनुष्यबळ वापरता येईल. व्हिएतनाममधील कॉन्सुलर अधिकारी चार्ली यांनी सांगितले की, भारतातील व्हिसा अर्ज व्हिएतनामपेक्षा वेगळा असून व्हिसा अर्जदारांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील.