माओवाद्यांचा शहरात प्रवेश; दिल्लीतील शेतकरी आंदोलनासह अग्निवीर विरोधातही सहभाग

माओवाद्यांनी २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. माओवाद्यांनी देशांतील काही आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. यामध्ये कृषी कायद्याविरोधात झालेले शेतकरी आंदोलनाचाही समावेश आहे. या कृषी कायदाविरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवण्यात आला. या सहभागामुळे आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले असल्याचे माओवाद्यांनी सांगितले आहे.

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात (Delhi Farmers Agitation) प्रवेश केल्याची कबुली माओवाद्यांनी (Maoist) दिली आहे. माओवाद्यांच्या केंद्रीस समितीच्या दस्ताऐवजात ही बाब नमूद केली आहे. माओवाद्यांनी एक पुस्तिका प्रकाशित (Book Publish) केली असून या पुस्तिकेत माओवाद्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव (Impact On City) वाढवण्याची रणनीती आखली असल्याचे समोर आले आहे.

    माओवाद्यांनी २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. माओवाद्यांनी देशांतील काही आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. यामध्ये कृषी कायद्याविरोधात झालेले शेतकरी आंदोलनाचाही समावेश आहे. या कृषी कायदाविरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवण्यात आला. या सहभागामुळे आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले असल्याचे माओवाद्यांनी सांगितले आहे. त्याशिवाय, अग्निवीर (Agniveer Scheme) योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही सहभाग नोंदवला असल्याचे माओवाद्यांच्या नमूद केले आहे.

    सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने देशातील शहरी भागांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या राज्यांतील शहरी भागात माओवादी प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. या राज्यातील शहरी भागात गनिमी काव्याने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन माओवाद्यांनी आपल्या दस्ताऐवजात केले आहे. बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमधील अनेक शहरी भागातही माओवाद्यांकडून प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे.