एक विवाह ऐसा भी! स्मशानभूमीत आली लग्नाची वरात, वधुवराच्या डोक्यावर पडल्या अक्षता, वाजत गाजत नवरी गेली सासरी

आजी प्रकाश कौर यांना पूजाच्या लग्नाची काळजी वाटत होती. कुटुंब गरीब असल्याने मुलीच्या लग्नासाठी वाडा बुक करता आला नाही. परिसरातील रहिवासी बारात जेवण, शगुन, कुटुंबासाठी लागणारे साहित्य आदींच्या सहाय्याने मुलीचे लग्न लावून देतात आणि येथूनच पूर्ण सन्मानाने डोलीला निरोप दिला जातो.

    सध्या देशभरात लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्न म्हण्टलं की डोळ्यासमोर येतं घोडीवरुन येणारा नवरदेव, वाजत गाजत येणारी वरात, लग्नाचा सजवलेला हॅाल. पंजाबमध्येही एक असंच लग्न पार पडलं. या लग्नात नवरदेव, वांजत्री, वर्हाडी होते पण लग्नाच हॅाल होता मेलेल्या लोकांची स्मशानभूमी. होय हे खरयं ! अमृतसरच्या मोहकमपुरा भागातील एका स्मशानभूमीत हे आगळंवेगळं लग्न पार पडलं. स्मशानभूमीतच लग्नाचे विधी पूर्ण झाले. स्मशानभूमीतून वरात निघण्याची ही बहुतेत पहिलीच घटना आहे.

    स्मशानभूमीत नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याची सुरुवात 

    पूजा या मुलीच्या  मुलीचे कुटुंब गरीब असून ती स्मशानभूमीतच राहते. ती तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. काही दिवसांपुर्वी तिच्या आजोबांचे निधन झाले आहे. स्मशानभूमीत बांधलेल्या छोट्या जुन्या घराच्या खोलीत आता फक्त आजी आणि नात राहतात. आजी प्रकाश कौर यांना पूजाच्या लग्नाची काळजी वाटत होती. कुटुंब गरीब असल्याने मुलीच्या लग्नासाठी हॅाल बुक करता आला नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनीच पाहुणेमंडळीसाठी जेवण, लग्नासाठी लागणां साहित्य इत्यादी पुरवतं मुलीचे लग्न लावून दिले. 

    वराचीही होती संमती

    परिसरातील रहिवासी अशोक कुमार, मनदीप सिंग आणि राजेश कुमार यांनी सांगितले की, जोडा फाटक ते बिल्ला वाला चौकाजवळील स्मशानभूमीत हा विवाह झाला. इथेच आजी आणि तिची एक नात खूप दिवसांपासून राहत होती. आजीचे वयही खूप आहे. परिसरातील नागरिकांनी मुलीसाठी मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले. स्मशानभूमीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलीशी लग्न करण्यास मुलाच्या घरच्यांनीही हरकत घेतली नाही. त्यामुळे लोकांच्या सहकार्याने लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून स्मशानभूमीतून डोलीला निरोप देण्यात आला. आचारी बोलवून खास पाहुण्यांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. स्मशानभूमीपेक्षा पवित्र स्थान नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस इथे यावेच लागते. असं इथल्या रहिवाशांनी म्हणणं आहे. त्यामुळे अत्यंत आंनदाने धुमधडाक्यात हा लग्न समारंभ पार पडला.