कर्नाटकात कोरोनानं डोकं काढलं वर, प्रशासन अलर्ट; ज्येष्ठांना मास्क घालण्याच्या सूचना!

केरळमधील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता, कर्नाटक सरकारने वृद्धांसाठी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे आणि त्याबद्दल सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

    कोरोनाचं संकट अजूनपर्यंत हद्दपार नाही झालेलं नाही आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे, केरळमध्ये कोरोना विषाणूचे नवीन सब-व्हेरियंट जेएन.१ (COVID sub variant) ची नोंद करण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी RT-PCR द्वारे 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली, ज्यात विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे पुन्हा कोरोनानं पाय पसरण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. मात्र, याची झळ कर्नाटकपर्यंतही गेल्याचं दिसत आहे. कर्नाटकचे सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि सह-रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

    कर्नाटक सरकारचा नागरिकांना इशारा

    केरळ आणि कर्नाटक या इतर राज्यांमध्ये कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. सोमवारी कर्नाटकातील कोडागु येथे पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला. इतकेच नाही तर घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मंत्री म्हणाले, काल कोविड-19 च्या प्रकरणांबाबत आम्ही बैठक घेतली, त्यामध्ये पुढील काय पावले उचलावीत यावर चर्चा करण्यात आली. आम्ही लवकरच सल्लाही जारी करू. ते म्हणाले की, ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांना हृदयविकार किंवा इतर आजार आहेत त्यांनी ताबडतोब मास्क घालणे सुरू करावे.

    कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आम्ही सरकारी रुग्णालयांना तयार राहण्याचा इशारा दिला आहे. केरळला लागून असलेल्या सीमांना अधिक सावध राहण्याची गरज आहे. मंगलोर, चमनाजनगर आणि कोडागु त्याच्या सीमेवर येत असल्याने आम्ही चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे आणि श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांना अनिवार्यपणे चाचणी करावी लागेल. अलीकडेच सिंगापूरहून भारतात आलेल्या एका भारतीय प्रवाशाची कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आली आहे.  यानंतर 79 वर्षीय महिलेमध्ये इन्फ्लूएंझा सारखी आजाराची लक्षणे दिसून आली. त्याच वेळी, तिरुचिरापल्ली आणि तमिळनाडूमधील इतर ठिकाणीही JN.1 च्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.