
मध्य प्रदेशात या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा करताना दिसत आहेत.
भोपाळ : मध्य प्रदेशात या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा करताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी शनिवारी भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे कन्व्हेन्शन हॉलमध्ये 66 नवीन दीनदयाल रसोई केंद्रांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी दीनदयाल रसोईच्या माध्यमातून सर्व गरजूंना 5 रुपयांत पोटभर जेवण मिळणार असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री शिवराजसिंह म्हणाले की, आतापर्यंत हे जेवण 10 रुपये प्रति थाळी दराने मिळत होते. मात्र, शनिवारपासून लोकांना 5 रुपये प्रति थाळी दराने पोटभर जेवण मिळणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शहरी भागातील 38,505 बेघर लोकांना जमिनीचे पट्टेही दिले.
जमीन आणि घराशिवाय राहणार नाही, या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ज्यांच घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांध शकली नाहीत. त्यांना मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत घरे दिली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. दीनदयाल रसोई योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 66 नगरपालिकांमध्ये कायमस्वरूप स्वयंपाकगृहे सुरू करण्यात येत आहेत हे एकत्र करून, आता राज्यात 166 दीनदयाल कायमस्वरूपी स्वयंपाकघ केंद्रे आहेत, जिथे पाच रुपयात जेवण मिळेल, असेही मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.