चांगली बातमी! एआरटी आणि सरोगसीचे नियमन करणार्‍या कायद्यांवरील प्रश्नांच्‍या निराकरणासाठी मेडलीगल हेल्पडेस्क

हा कायदा काळाची गरज होता आणि अखेर हा कायदा लागू झाल्याचा आम्हाला आनंद आहे. पण, एआरटी कायद्याचे अनेक कायदेशीर पैलू आहेत, जे रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या संदर्भात समजून घेतले पाहिजेत.

  • बीएसव्‍ही स्‍टार्टविथयू कॉन्‍क्‍लेव्‍हचा भाग असलेला पहिलाच उद्योग उपक्रम

दिल्ली : भारत सीरम्‍स ॲण्‍ड व्‍हॅक्सिन्‍स लिमिटेड (BSV) ने इंडियन सोसायटी ऑफ असिस्‍टेड रिप्रॉडक्‍शन (SAR), अकॅडमी ऑफ क्लिनिकल एम्ब्रियोलॉ‍जिस्‍ट्स (ACE), इंडियन फर्टिलिटी सोसायटी (IFS) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसनी ॲण्‍ड लॉ यांच्‍यासोबत सहयोगाने १९ व २० नोव्‍हेंबर रोजी दिल्‍लीमध्‍ये दोन-दिवसीय कॉन्‍क्‍लेव्‍हचे आयोजन केले.

या कॉन्‍क्‍लेव्‍हने असिस्‍टेड रिप्रॉडक्टिव्‍ह टेक्‍नोलॉजी ॲक्‍ट २०२२ (ART LAW) अंतर्गत समाविष्‍ट विविध विषयांवर सल्‍लामसलत चर्चा करण्‍यावर लक्ष केंद्रित केले. या कॉन्‍क्‍लेव्‍हच्‍या सर्वात लक्षणीय परिणामांपैकी एक म्‍हणजे ईमेल हेल्‍पडेस्‍क bsv.arthelpdesk@imlindia.com ची निर्मिती, जो फर्टिलिटी क्लिनिक्‍ससाठी अद्वितीय मेडलीगल हेल्‍पडेस्‍क आहे. या हेल्पडेस्कवर ईमेल केलेल्या एआरटी कायदा आणि सरोगसी कायद्यावरील तज्ञांच्या केंद्रांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे ४८ तासांच्या आत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन ॲण्‍ड लॉच्या कायदेशीर तज्ञांकडून दिली जातील.

कॉन्क्लेव्ह हे पहिलेच व्यासपीठ होते, ज्यामध्ये आयएसएआर, आयएफएस आणि एसीई या तिन्‍ही प्रमुख संस्थांचा सहभाग होता, तसेच एआरटी ॲक्‍ट, २०२२ च्या राष्ट्रीय मंडळातील तज्ञ सल्लागारांचा सहभाग होता. या कॉन्‍क्‍लेव्‍हमध्‍ये वंध्यत्वावरील अनेक आघाडीच्या तज्ञांनी पुरुष वंध्यत्व, इम्युनोथेरपी व आयव्‍हीएफ उपचारांमधील वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगती यावर विस्तृत चर्चा करण्यासोबत आयव्‍हीएफ उपचारांवरील एआरटी कायदा तसेच एआरटी कायद्याच्या सभोवतालची क्लिनिकल आव्हाने यावर चर्चा केली.

हे कॉन्क्लेव्ह चर्चा केलेल्या अनेक मुद्द्यांवर शिफारशी देखील देईल, जे उपचाराचा लाभ घेणाऱ्या आणि एआरटी कायदा व सरोगसी कायद्याचे पालन करणाऱ्या जोडप्यांना सेवा देण्यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणून काम करतील.

तसेच बीएसव्‍हीने फर्टिलिटी क्लिनिक्‍ससोबत त्‍यांना एआरटी कायद्याचे पालन करण्‍यास सुसज्‍ज करण्‍याच्‍या उद्देशाने काम करण्‍यासाठी, तसेच कायद्यामध्‍ये उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या पायाभूत सुविधा व दस्‍तऐवजीकरणाशी संबंधित मानक प्रोटोकॉल्‍स व प्रक्रियांचे पालन करण्‍यामध्‍ये या क्लिनिक्सना साह्य करण्‍यासोबत त्‍यांचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी अग्रगण्‍य एजन्‍सीसोबत सहयोग केला आहे.

“हा कायदा काळाची गरज होता आणि अखेर हा कायदा लागू झाल्याचा आम्हाला आनंद आहे. पण, एआरटी कायद्याचे अनेक कायदेशीर पैलू आहेत, जे रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या संदर्भात समजून घेतले पाहिजेत. या सल्लागार दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून आम्ही एआरटी कायद्याबद्दल अधिक जागरूकता, पालन आणि जबाबदारी आणण्याचा प्रयत्न करतो”, असे एआरटी ॲक्‍ट २०२२ च्‍या राष्‍ट्रीय मंडळामधील तज्ञ सल्‍लागार आणि इंदिरा आयव्‍हीएफचे सह-संस्‍थापक डॉ. नितीज मुर्दिया म्‍हणाले.

“देशातील कृत्रिम प्रजनन तंत्राचे भविष्य घडविण्यासाठी एआरटी कायदा महत्त्वपूर्ण आहे. एआरटी कायद्याचा उद्देश रुग्णांना मौल्यवान अनुभव देण्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणणे आहे. देशात वंध्यत्वाचा भार वाढत असताना रुग्णांचे समाधान सुधारेल आणि देशातील उप-प्रजननक्षम जोडप्यांना आनंद देणारी नियामक आराखडा असणे अत्‍यंत महत्त्वाचे होते,’’ असे एआरटी ॲक्‍ट २०२२ च्‍या राष्‍ट्रीय मंडळामधील तज्ञ सल्‍लागार डॉ. आरजी पटेल म्‍हणाले.

“एआरटी कायद्याचा फर्टिलिटी क्लिनिकस व बँकाचे नियमन व पर्यवेक्षण करण्‍याचा, गैरवापराला प्रतिबंध करण्‍याचा आणि एआरटी सेवांच्‍या सुरक्षित व नैतिक पद्धतींना प्राधान्‍य देण्‍याचा मनसुबा असताना झपाट्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान, सामाजिक बदलांप्रती मागण्‍या, तसेच रूग्‍णाच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍याची गरज आहे,’’ असे इंडियन सोसायटी ऑफ असिस्‍टेड रिप्रॉडक्‍शनच्‍या अध्‍यक्षा डॉ. नंदिता पालशेटकर म्‍हणाल्‍या.

“सध्‍या १० ते १४ टक्‍के भारतीय जोडप्‍यांना वंध्‍यत्‍वाचा अनुभव येत असताना आधुनिक उपचार पद्धती आवश्‍यक असलेल्‍या रूग्‍णांसाठी कार्यक्षमपणे व प्रभावीपणे कार्य करतील, याची वैज्ञानिक प्रगती खात्री देते. आम्‍ही वैद्यकीय व नैतिक एआरटी पद्धतींचे मानकीकरण करण्‍याचा मनसुबा असलेल्‍या एआरटी ॲक्‍ट ॲण्‍ड रूल्‍स २०२२ चे स्‍वागत करण्‍यासोबत सक्षम व सहाय्यक परिसंस्‍था निर्माण करण्‍याप्रती काम करत आहोत, जेथे या पद्धतींचा सर्वोत्तमरित्‍या व उत्‍साहात अवलंब केला जाईल. संबंधित भागधारकांसोबत या सहयोगात्‍मक व सल्‍लागार चर्चांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही रूग्‍णांसाठी अनुकूल व प्रमाणित असणाऱ्या उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींना आकार देण्‍याचा प्रयत्‍न करतो,’’ असे बीएसव्‍हीच्‍या इंडिया बिझनेसचे सीओओ विश्‍वनाथ स्‍वरूप म्‍हणाले.