j p nadda son marriage

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांचा मुलगा हरिश नड्डा (Harish Nadda Marriage) याचं जयपूरमधील (Jaipur) हॉटेल व्यावसायिकाची मुलगी रिद्धीसोबत लग्न होणार आहे.

  जयपूर: राजमहल पॅलेस, जयपूरचं भव्य किलेनुमा हॉटेल, ज्याचं काही तासांचं भाडेदेखील लाखोंच्या घरात आहे. या किलेनुमा हॉटेलमध्ये, राजमहल पॅलेसमध्ये आज रात्री भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांचा मुलगा हरिश नड्डा (Harish Nadda Marriage) याचं जयपूरमधील (Jaipur) हॉटेल व्यावसायिकाची मुलगी रिद्धीसोबत लग्न होणार आहे. या लग्नासाठी दोन हॉटेल्समध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

  द ललितमध्ये लग्नाआधीचे फंक्शन, राजमहल पॅलेसमध्ये लग्न
  लग्नातील हळदी, मेहंदी आणि इतर समारंभ आज जयपूरच्या मालवीय नगर भागातील द ललित हॉटेलमध्ये होणार आहेत. त्यानंतर रात्री आठ वाजता राजमहल पॅलेसमध्ये भव्य विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हॉटेलला सुंदर सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.

  राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील मेन्यू
  लग्नासाठी अनेक पक्वान्न खास बनवण्यात येत आहेत. नड्डा मुळचे हिमाचलचे आहेत आणि त्यांचे व्याही राजस्थानमधील जयपूरचे आहेत. त्यामुळे या लग्नामध्ये पाहुण्यांसाठी दोन्ही राज्यातील पदार्थ बनवण्यात आले आहेत. लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी राजस्थानी पदार्थांमध्ये गोंद पाक, मोहनथाल, मुग – बदाम हलवा, मावा आणि खव्यापासून बनवलेले मिठाईचे अनक प्रकार तसेच गरम राब आणि बाजरीच्या खिचड्यासोबत मक्याची रोटी आणि सरसोची भाजीदेखील मेन्यूमध्ये आहे. राजस्थानी पदार्थांशिवाय हिमाचली डिशेसची रेलचेल या लग्नसोहळ्यात असणार आहे. फाईव्ह स्टार हॉटेलच्या खास किचनमध्ये हे खास पदार्थ बनवण्यात येत आहेत. थोडक्यात दोन राज्यांमधील खाद्यसंस्कृतीचं मिलन या लग्नामध्ये होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळ्या वयोगटातील लोकांना आवडतील असे अन्नपदार्थ लग्नासाठी बनवण्यात येत आहेत.

  हॉटेलच्या आत आणि बाहेर विशेष गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. लग्नाच्या कार्यक्रमात कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून हे गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. जयपूरमध्ये होत असलेल्या या विवाह सोहळ्यानंतर हिमाचल आणि दिल्लीमध्ये पुन्हा मोठ्या फंक्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. दिल्लीतील कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेता सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण हा सगळा सोहळा राजेशाही थाटात पार पडणार आहे , असं चित्र निर्माण झालं आहे.