milk price hike

देशातल्या महागाईचा (Inflation) परिणाम आता दुधाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. डेअरी कंपन्यांकडून आगामी काळात दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) केली जाऊ शकते.

    मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता दुधाचे दर (Milk Price Hike) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उष्णतेमुळं दूध उत्पादन घटलं आहे. मागणी वाढल्यामुळे दुधाच्या दरात वाढ होऊ शकते.

    देशातल्या महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. डेअरी कंपन्यांकडून आगामी काळात दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) केली जाऊ शकते. अलीकडे जागतिक स्तरावर स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder) आणि पशुखाद्याचे (Animal feed) दर वाढले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दुधाचे दर वाढण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

    सर्व डेअरीज दुधाचे दर ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. सर्व डेअरीज आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किमती वाढवतील, असा अंदाज आहे.

    गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू झाल्याने दुधाची मागणी झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत झालेली वाढ आणि उष्णतेमुळे दुधाचं घटलेलं उत्पादन या घटकांचाही परिणाम दरावर झालेला आहे. परिणामी घाऊक दुधाचे दर दर वर्षी वाढतच आहेत. उदाहरणार्थ, अखिल भारतीय पातळीवर जूनमध्ये दुधाचे दर ५.८ टक्क्यांनी वाढले होते. दक्षिण भारतात दुधाचे दर वर्षाला ३.४ टक्के वाढले आहेत.