
केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती.
नवी दिल्ली – काल (बुधवारी, २३ ऑगस्ट) भारताने एक इतिहास रचला आहे. ISRO नं देशाच्या शिरपेचात मानाता तुरा खोवला. चांद्रयान-3 ची (Chandrayaan-3) मोहीम फत्ते करुन जगाचे लक्ष भारताकडे वेधले आहे. सध्या जगभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगमध्ये अनेकांचे हात लागले आहेत. अनेकांनी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करुन ही मोहिम फत्ते करण्यासाठी काम केले. पण या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली ती “मिसाईल वुमन” टेसी थॉमस यांनी. (Tessie Thomas) ‘रॉकेट वुमन’ डॉ. रितु करिधाल यांच्या खांद्यावर चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण याचबरोबर चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी इस्त्रोमध्ये अनेक महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामध्ये “मिसाईल वुमन” टेसी थॉमस यांची कामगिरी सध्या लक्षवेधी ठरली आहे.
‘मिसाईल वुमन’ ओळख कशी मिळाली
डॉक्टर एपी जे अब्दुल कलाम सरांना आपण “मिसाईल मॅन” म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थॉमसना “मिसाईल वुमन” म्हणून ओळखतात. टेसी थॉमस “भारतीय अंतराळ संशोधन संस्थे” (इस्रो) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमध्ये कार्यरत आहेत. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने “अग्नी” क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली. आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थॉमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वामुळं त्यांना “मिसाईल वुमन” अशी ओळख मिळाली.
कशी झाली सुरुवात…
दरम्यान, केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरुन डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तीचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाउन पोहोचल्या. तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख ” अग्निपुत्री ” म्हणूनही झाली.
टेसी थॉमस यांचा नवोदितांसाठी आदर्श
आज ४९ वर्षे वय असलेल्या टेसी थॉमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यानाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार राहावे लागत असूनही, आपल्या हाताने बनविलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. टेसी थॉमस यांची कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आणि आजही महिलांना कमी लेखणाऱ्यांना टेसी थॉमस यांच्या रुपाने एक सणसणीत चपराक ठरली आहे. आज इस्रोमद्धे तब्बल बाराशे महिला शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही. टेसी थॉमस यांचा प्रेरणादायी प्रवास आणि आदर्श नवोदितांसाठी घेण्यासारखा आहे. आणि यातून खूप शिकण्यासारखे आहे.