संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा चार्जिंग सुरु असताना फोनवर बोलल्याने मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण आता धावत्या ट्रेनमध्ये बसलेला प्रवासी मोबाईलवर बोलत असताना मोबाईलचा स्फोट झाला.

मुंगेर : मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा चार्जिंग सुरु असताना फोनवर बोलल्याने मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण आता धावत्या ट्रेनमध्ये बसलेला प्रवासी मोबाईलवर बोलत असताना मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण डबाच धुराने भरला होता. धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

संबंधित प्रवासी हा विक्रमशीला सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करत होता. फोनवर बोलत असलेल्या या तरुणाच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. या घटनेनंतर प्रवाशाला धक्काच बसला. मोबाईलच्या बॅटरीचा हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण हा मोबाईलचा स्फोट होईल, असे त्याला वाटले नव्हते. त्यानंतर ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. या घटनेनंतर रेल्वे पोलीस तातडीने तपासकार्यासाठी लागले होते. तपासणीनंतर गाडी रवाना करण्यात आली. मात्र, ही विक्रमशिला एक्स्प्रेस सुरू होण्यासही उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी प्रवाशाची ओळख पटली

विक्रमशिला सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या एस-9 डब्यात ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशाची ओळख पटली आहे. संदीप कुमार असे या प्रवाशाचे नाव असून, तो खडगपूरचा रहिवासी आहे.

प्रवाशाचा पाय पूर्ण भाजला

या घटनेत तरुणाचा पाय पूर्णपणे भाजला आहे. हातातून मोबाईल निसटल्याने तरुणाच्या पायावर पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याचा पाय भाजला आहे. या घटनेनंतर इतका गदारोळ झाला की, रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे ट्रेन उशिराने सुटली.