मोदी आणि शाहांनी दररोज ‘एवढे’ चालून दाखवावे, काँग्रेसचे भाजपाला आव्हान

भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Narendra Modi and Home Minister Amit Shah) यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी भाजपला दिलं आहे. भारत जोडो यात्रा ही एक चळवळ आहे, एक मुव्हमेंट आहे, इव्हेंट नाही. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगले माहित आहे.

    नवी दिल्ली – काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रेला (Bharato Jodo Yatra) देशभरात प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढणार आहेत, महाराष्ट्रातून देखील ही यात्रा येऊन गेली आहे. दरम्यान, भाजप भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधी व काँग्रेसवर टिका करत असताना, तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी भारत जोडो यात्रेचा ‘इव्हेंट’ असा उल्लेख केला होता. आता काँग्रेसनं देखील यावर भाजपाला जोरदार प्रतिउत्तर देत पलटवार केला आहे.

    दरम्यान, राहुल गांधी दररोज 8-8 तास चालताहेत. मग भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Narendra Modi and Home Minister Amit Shah) यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी भाजपला दिलं आहे. भारत जोडो यात्रा ही एक चळवळ आहे, एक मुव्हमेंट आहे, इव्हेंट नाही. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगले माहित आहे, कारण ते उत्तम इव्हेंट मॅनेजमेंन्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. इव्हेंट हा दोन-चार दिवस चालतो. सतत 40 दिवस चालत नाहिय. भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपला दिलं आहे.