जापानी मुलाच्या हिंदीने भारावले मोदी; पंतप्रधान मोदींचे अनोख्या अंदाजात स्वागत

हजारो भारतीयांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान, एका हॉटेलमध्ये जपानच्या मुलांनीही पंतप्रधान मोदींचे अनोख्या अंदाजात स्वागत केले. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

     

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्सच्या शिखर सम्मेलनासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोमध्ये त्यांचे जबरदस्त स्वागत झाले. यावेळी हजारो भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान, एका हॉटेलमध्ये जपानच्या मुलांनीही पंतप्रधान मोदींचे अनोख्या अंदाजात स्वागत केले. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

    टोकियो येथे पोहोचल्यानंतर, अनेक मुले पीएम मोदींच्या स्वागतासाठी पोहोचले होते. ही मुले हातात पेंटिंग घेऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत करत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी या मुलांच्या पेंटिंग्सवर ऑटोग्राफही दिले. यावेळी या मुलांनी पंतप्रधान मोदींसोबत हिंदी भाषेत संवाद साधला. यावर मोदी म्हणाले, ‘व्वा! तू हिंदी कुठून शिकलास? फार छान समजतं.’