मोहम्मद शमीला घटस्फोटित पत्नीला दर महिना द्यावी लागणार लाखांत पोटगी? चर्चेत आलेली हसीन जहा आहे तरी कोण?

क्रिकेटपटू मोहम्मद (Mohmad Shami) शमीला कोलकाता (Kolkata) न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

  कोलकता : क्रिकेटपटू मोहम्मद (Mohmad Shami) शमीला कोलकाता (Kolkata) न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

  घटस्फोट घेतला होता

  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकात भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, शमीची पत्नी हसीन जहाँनं सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा फोटो शेअर केला त्या माध्यमातून तिने शामीवर निशाणा साधला होता. दोघांचे संबंध हे ताणले गेले होते. यामुळे तिने त्याच्यापासून फारकत घेत घटस्फोट घेतला होता.

  हसीन हिने पोटगीसाठी २०१८ मध्ये कोर्टात केस दाखल करत तब्बल १०० लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी केली होती. यातील ७ लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित तीन लाख रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील असे कोर्टाने सांगितले होते.

  शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये सर्वाधिक होते. त्यानुसार या पोटगीची मागणी करण्यात आल्याची माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली. शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

  हम्मद शामीचे वकील सेलिम रहमान यांनी देखील कोर्टात युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की, हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करते. तिचे स्वत:चे उत्पन्न असून तिने पोटगी मागणे चुकीचे आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर शमीला हसीन हिला दरमहा १ लाख ३० हजार रुपये पोटगी देण्यास सांगितले. यातील ५० हजार रक्कम ही हसीनला तर उर्वरित रक्कम ही टीच्या मुलीसाठी दिली जाणार आहे. कोर्टाच्या या निकाला बाबत हसीनने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ हे दोघे 2014 रोजी लग्नबंधनात अडकले. शमीची पत्नी हसीन जहाँ ही एक अभिनेत्री आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर शमी आपल्यावर हिंसाचार करीत असल्याचा आरोप हसीनने केला होता. त्यानंतर बराचकाळ शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे व्यथित होता. परंतु आता तो पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. सध्या शमी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातही आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत आहे.